यश भारद्वाज आणि अभिलाषा राऊत
Published in Vol.16, 2026
KEYWORDS: आजीविक, मक्खली गोषाळ, नियती, नास्तिक, कर्म, जीविका
ABSTRACT:
भारतीय तत्वज्ञानाच्या वैचारिक परंपरेत सहा आस्तिक व तीन नास्तिक विचारप्रवाह मानले जातात. त्यापैकी प्राचीन भारतीय तत्वज्ञानातील एक महत्वाचा परंतु तुलनेने कमी अभ्यासलेला नास्तिक विचारप्रवाह म्हणजे आजीविक विचारप्रवाह होय. इस पूर्व सहाव्या शतकात बौद्ध धर्म व जैन धर्म यांच्या समकालीन असलेल्या या विचारप्रवाहाची मुख्य शिकवण ‘नियती’ या तत्वावर आधारित होती. ‘नियतीवाद’ म्हणजेच सर्व घटना आणि मानवी जीवनातील प्रत्येक पैलू हा पूर्वनिर्धारित असतो आणि मानवी प्रयत्न किंवा कर्म त्यावर परिणाम करू शकत नाही. सर्व काही नियतीनुसार व मानवी नियंत्रणाच्या पलीकडे नैसर्गिक नियमानुसार घडते अशी धारणा असणाऱ्या आजीविक विचारप्रवाहाने तत्कालीन भारतीय तत्वज्ञानाच्या मान्य विचारप्रवाहामध्ये क्रांतीकारक बदल घडवून आणले. तसेच प्राचीन भारतीय वैचारिक चिंतन परंपरेत मानवी जीवन व मोक्ष यावर पुनर्मंथन करण्यास प्रवृत्त केले, हे या शोध निबंधातून सिद्ध होते.
